परळी विधानसभेची जागा शिवसेना लढणार
-जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांची माहिती
परळी : राज्यात महाविकास आघाडी मजबूत असल्याचे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीनंतर स्पष्ट झाले. आगामी विधानसभा निवडणूकीत परळी विधानसभेची जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुर्ण ताकदीने लढवणार असल्याची माहिती बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांनी दिली.
परळी येथे गट प्रमुख, बीएलओ प्रमुखांचा मेळावा मंगळवार (६ आॅगस्ट) रोजी घेण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन जाधव बोलत होते. बीड लोकसभा संपर्कप्रमुख माजी आ.सुनील धांडे, बीड जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे, उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते, तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल,शहरप्रमुख राजेश विभुते यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसेना उपतालुकाप्रमुख महेश केंद्रे, संजय राठोड, शंकर डाके, तालुका सचिव प्रकाश साळुंखे, तालुका संघटक हनुमान भारती,सत्यमेव नखाते, सुरेश जाधव, सुंदर उंबरे यांंनी परिश्रम घेतले. पुढे बोलताना जाधव यांनी नवडणूकी बाबत पदाधिकाºयांना मार्गदर्शन केले.
शासनाकडे बोट न दाखवता आपण आपल्या वयाएवढी झाडे लावू
जिल्हा परिषदेच्या 98 शाळा 10 वर्षांपासून ईमारत विरहीत
रिक्षात बिघाड झाल्याच्या तक्रारीमुळे कडूंनी अधिकाऱ्यांना कानशिलात लगावली
प्रास्ताविक शिवसेना तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल यांनी तर सूत्रसंचालन शहरप्रमुख राजेश विभुते यांनी तर आभार प्रदर्शन विधानसभा प्रमुख जगन्नाथ साळुंके यांनी मानले.