बीडमध्ये शिवसेनेच्या भगव्या सप्ताहास सुरूवात भगव्या झेंड्याचे वाटप

-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून भगव्या झेंड्याचे वाटप

0

बीडमध्ये शिवसेनेच्या भगव्या सप्ताहास सुरूवात

-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून भगव्या झेंड्याचे वाटप

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या भगवा सप्ताहची सुरूवात करण्यात आली असून या सप्ताहाच्या माध्यमातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सर्वत्र मार्गदर्शन करीत आहेत. यावेळी ते आपल्या ठाकरे शैलीत सरकारचा खरपूस समाचार घेत शिवसेनेचा विचार मनामनात घराघरात पोहचवत आहेत. त्यात बीडमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून भगव्या झेंड्याचे वाटप केले आहे.

यामुळे बजाजनगर शाखेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप चौक येथिल सर्व स्थानिक व्यापारी, व्यवसायिक, नागरिकांना भगवे झेंडे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्यांच्या या उपक्रमास सर्व स्थानिक नागरिकांनी,व्यापाºयांनी स्थानिक नागरिकांनी प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. यावेळी विशाल खंडागळे उपजिल्हाप्रमुख प्रमुख बाप्पाजी दळवी, अरविंदजी धिवर, शहर प्रमुख सागर शिंदे, उपतालुकाप्रमुख सुदाम भंडे, अमोल वाघमारे , विष्णू पटले, यांच्यासह स्थानिक नागरिकांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.