सिंगापूरचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली तर भारताला ८२ वे स्थान
– भारताच्या मानांकनात ५ स्थानांनी घसरण
नवी दिल्ली : हेन्ली अँड पार्टनर्स या पासपोर्ट रँकिंग संस्थेने जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत सिंगापूरचा पासपोर्ट हा जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे. याशिवाय या यादीत भारताला ८२ वे स्थान मिळाले आहे. भारतीय पासपोर्टवर ५८ देशांमध्ये व्हिसा फ्री एंट्री आहे. याआधी जानेवारीत जाहीर झालेल्या निदेर्शांकात भारताच्या मानांकनात ५ स्थानांनी घसरण झाली होती. २०२३ मध्ये भारत ८० व्या स्थानावर होता.
तैवान आणि फिलीपिन्समध्ये जेमी वादळाचा तडाखा
चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला
लाडकी बहीणच्या नोंदणीसाठी तीन दिवसीय शिबिर
सिंगापूरच्या पासपोर्टला या पहिले स्थान मिळाले आहे, ज्याला १९५ देशांमध्ये व्हिसा मुक्त वैधता आहे. जपानसोबतच फ्रान्स, इटली, जर्मनी आणि स्पेन दुसºया क्रमांकावर आहेत, ज्यांच्या पासपोर्टवर १९२ देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवास करता येतो. तसेच इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या आकडेवारीच्या आधारे क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आॅस्ट्रिया, फिनलंड, आयर्लंड, लक्समबर्ग, नेदरलँड, दक्षिण कोरिया आणि स्वीडन हे १९१ देशांमध्ये मोफत व्हिसा प्रवेशासह तिसºया स्थानावर आहेत. तसेच भारताच्या शेजारील देश पाकिस्तानचा पासपोर्ट हा जगातील चौथ्या क्रमांकाचा कमकुवत पासपोर्ट आहे.
पाकिस्तानच्या पासपोर्टची क्रमवारी १०० आहे. येथील नागरिक ३३ देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवास करू शकतात. जवळपास दोन वर्षांपासून युद्ध सुरू असतानाही युक्रेनचा पासपोर्ट भारताच्याच नव्हे, तर रशियाच्या पासपोर्टपेक्षाही अधिक शक्तिशाली आहे.
इस्रायलच्या पासपोर्टची रँकिंग १८ वर
हेन्ली अँड पार्टनर्सच्या क्रमवारीत युक्रेनियन पासपोर्ट ३० व्या क्रमांकावर आहे. येथील नागरिक १४८ देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवास करू शकतात. तर रशियन पासपोर्टची रँकिंग ४५ आहे. रशियन नागरिक व्हिसाशिवाय ११६ देशांना भेट देऊ शकतात. १० महिन्यांपासून हमासशी युद्ध सुरू असलेल्या इस्रायलच्या पासपोर्टची रँकिंग १८ आहे.
जगातील सर्वात कमकुवत पासपोट
अफगाणिस्तानचा पासपोर्ट 103 व्या क्रमांकासह जगातील सर्वात कमकुवत पासपोर्ट आहे. अफगाण पासपोर्टवर व्हिसा फ्री प्रवास केवळ 26 देशांमध्ये करता येतो.