लाडक्या बहिणींची मते फिक्स करण्यासाठी खटाटोप?

-यादीला पालकमंत्र्यांची मान्यता घेण्याचे जिल्हाधिकारी यांना ओदश

0

लाडक्या बहिणींची मते फिक्स करण्यासाठी खटाटोप?

-यादीला पालकमंत्र्यांची मान्यता घेण्याचे जिल्हाधिकारी यांना आदेश

जालना : आगामी विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींची मते फिक्स करण्यासाठी रक्षाबंधन भेट म्हणून १७ ऑगस्ट रोजी जुलै व ऑगस्टचे मिळून ३ हजार रुपये बँक खात्यात वर्ग करण्याचे सरकारने ठरविल्याचे दिसत आहे. त्यामुळे पात्र यादीला समितीची मान्यता मिळाली नसली तरीही ती यादी पुढील कार्यवाहीसाठी पाठवावी. समितीची मान्यता घेण्यास अडचणी येत असल्यास पालकमंत्र्यांची मान्यता घ्यावी, असा पर्याय जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे.

महयुती सरकारने २८ जून २०२४ रोजी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यासाठी नारीशक्ती अ‍ॅपच्या माध्यमातून अर्ज मागवले. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला १५०० मिळणार आहेत. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यावर १७ ऑगस्ट रोजी जमा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी सुलभ होण्यासाठी आतापर्यंत आठ शासन निर्णय काढले आहेत.

राज्य सरकारने काढलेल्या १० ऑगस्टच्या शासन निर्णयात ज्या जिल्ह्यात विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठीत झाली नसेल तसेच विधानसभा क्षेत्र समितीकडून पात्र लाभार्थींची यादी अंतिम झाली नसल्यास जिल्हाधिकारी यांनी पात्र लाभार्थी महिलांची यादी पुढील कार्यवाहीसाठी  पाठवावी. तसेच समितीची मान्यता होण्यास अडचणी येत असल्यास पालकमंत्र्यांची मान्यता घेण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे. यामुळे सरकारडून आगामी विधानसभा निवडणूकीत लाडक्या बहीणीची मते मिळविण्यासाठी ही खटाटोप सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.