बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची लागवड
-पावसामुळे पिकाची गुणवत्ता सरस
जालना : पेरणीसह बियाण्यांचा कमी खर्च, बीबीएफ पद्धतीची लागवड करून ४ हजार हेक्टरवर नव्या पद्धतीने लागवड करून दिलेल्या सोयाबीन पिकातून उत्पन्न वाढून देण्यासाठी कृषी विभागाच्या आत्माकडून प्रयोग करण्यात आला आहे. सध्या हे पीक तोºयात डौलत असून मोठ्या प्रमाणात फुले लगडली आहे. दरम्यान, महिनाभरापासून कमी जास्त प्रमाणात पाऊस झाला असला तरी या पध्दतीने लागवड केलेले सोयाबीनची गुणवत्ता सरस ठरली आहे.
सोन्या-चांदीचे दर कमी होण्याची शक्यता सीमाशुल्क ६ टक्क्यांनी कमी करणार असल्याची अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा
अर्थसंकल्पातून कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा तीन औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा
शेतकºयांच्या उत्पादनात व परिणामी उत्पन्नाचा वाढ होण्यासाठी कृषी तंत्रज्ञानात विविध उपक्रम राबवले जात आहेत. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकºयांना त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. यातील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड होणाºया सोयाबीन पिकामध्ये मूलस्थानी जलसंधारण करण्यासाठी बीबीएफवरील तंत्रज्ञान व जोड ओळ तंत्रज्ञान चा अवलंब करून आत्माच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेबाबत मोठी घोषणा १० लाख कोटी रूपयांची तरतुद
या वर्षी जवळपास २०० प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. जोड ओळ पद्धतीमध्ये पट्टा सोडला जातो. त्यामुळे या पद्धतीमध्ये रोपातील व ओळींतील अंतर कायम राहून काही अंतरावर सोडलेल्या पट्ट्यामुळे त्यात सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणातच मिळून हवा खेळती राहते व रोपांची चांगली वाढ होण्यास मदत होते. तर पट्ट्यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होते. तसेच पाणी व्यवस्थापन व खत व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येतो, असे आत्माच्या प्रकल्प संचालकांनी सांगितले.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी ६ महिने मुदत – मनोज जरांगे यांच्या मागणीला यश
शरद पवार ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत -लक्ष्मण हाके यांची पवारांवर टीका