बस स्थानकावर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमणूक करण्याबाबत बहुजन मुक्ती पार्टीतर्फे निवेदन
टेंभुर्णी (महेंद्र सोनवणे) : येथील बस स्थानकावरती कायमस्वरूपी महिला व पुरुष पोलीस कर्मचारी नेमणूक करण्याबाबत बहुजन मुक्ती पार्टीतर्फे निवेदन. दिनांक 26/ 1/ 2025 रोजी बहुजन मुक्ती पार्टी द्वारे टेंभुर्णी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले .या संदर्भात टेंभुर्णी हे सोलापूर जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून तसेच महाराष्ट्रातील हजारो प्रवासी ये जा करीत असतात. सदर बस स्थानकावर चोरीचे प्रमाण खूप वाढलेले आहे. यामध्ये सर्व सामान्य नागरिक व महिला व वृद्धांना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. यापूर्वी अनेक वेळा सदर बस स्थानक मधून चोऱ्या झाल्याचे समोर आलेले आहेत .तसेच चोऱ्या होत आहेत .त्या संदर्भात सदर बस स्थानकामध्ये एक महिला पोलीस कर्मचारी व एक पुरुष पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी.
यावेळी उपस्थित एडवोकेट तुकाराम राऊत ,जिल्हाध्यक्ष बी एम पी ,धनंजय सुब्बाराव जगताप सामाजिक, कार्यकर्ते, महेंद्र सोनवणे बीएमपी तालुकाध्यक्ष, भोसले एस यु सामाजिक कार्यकर्ते, गुरुदेव लोंढे सामाजिक कार्यकर्ते ,नागनाथ जगताप बी एम.युवा तालुका अध्यक्ष उपस्थित होते.