महिला डॉक्टर हत्येप्रकरणी खासगी डॉक्टरांचा एकदिवसीय संप

- काळ्या फिती लावून सरकारी डॉक्टरांचे कामकाज सुरू

0

महिला डॉक्टर हत्येप्रकरणी खासगी डॉक्टरांचा एकदिवसीय संप

– काळ्या फिती लावून सरकारी डॉक्टरांचे कामकाज सुरू

बीड : कोलकाता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ शनिवारी जिल्ह्यात खासगी डॉक्टरांनी एकदिवसीय संप केला. सुमारे ६ हजार खासगी वैद्यकीय व्यावसायिक यात सहभागी होते. त्यामुळे नियोजित सुमारे ४०० छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. तर दुसरीकडे सरकारी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. संपामुळे खासगी रुग्णालये बंद असल्याने सरकारी रूग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली होती.

महिला डॉक्टर हत्येप्रकरणी खासगी डॉक्टरांचा एकदिवसीय संप: कोलकाता येथील एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. त्यामुळे बीडमध्ये डॉक्टरांनी कँडल मार्च काढून निवेदन दिले होते. आयएमएने देशभर शनिवारी संपाचे आवाहन केले होते. याला हिमा या होमिओपॅथी डॉक्टरांच्या संघटनेने व निमा या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या संघटनेने पाठिंबा देत संपात सहभाग नोंदवला होता.

महिला डॉक्टर हत्येप्रकरणी खासगी डॉक्टरांचा एकदिवसीय संप: जिल्ह्यातील सुमारे ६ हजार खासगी वैद्यकीय व्यावसायिक उत्स्फूर्तपणे संपात सहभागी झाले होते. खासगी दवाखाने बंद असल्याने सरकारी रुग्णालयांत गर्दी वाढली होती. सरकारी डॉक्टरांचा या संपात सहभाग नव्हता. मात्र त्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले . सरकारी रुग्णालयांत शनिवारी ११२७ रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी केली गेली, तर ४६५ रुग्ण आंतररुग्ण विभागात दाखल होते.

दुचाकी रॅली काढून निषेध

अंबाजोगाईतील रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर, खासगी वैद्यकीय व्यावसायिक,आंतरवसिता विद्यार्थी, वैद्यकीय विद्यार्थी, नर्सिंग स्टाफ यांच्या संघटनांनी शनिवारी दुचाकी रॅली काढून निषेध नोंदवला. सर्व डॉक्टरांनी प्रतिसाद देत संप यशस्वी केला, अशी माहिती आयएमएचे बीड अध्यक्ष अविनाश देशपांडे व माजी अध्यक्ष अनिल बारकुल यांनी दिली. दरम्यान, धारूर येथे बंदला प्रतिसाद मिळाला.

माजलगावमध्ये कँडल मार्च

माजलगावमध्ये कँडल मार्च काढून या घटनेचा निषेध नोंदवला गेला. या वेळी शहरातील वैद्यकीय व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आष्टी तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने संपात सहभाग नोंदवला गेला. मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले गेले. यावेळी मोठ्या संख्येने डॉक्टर सहभागी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.