मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये अचानक बिघाड

जगभरातील व्यवहार ठप्प -भारतासह २० देशांमध्ये विमानसेवेवर परिणाम, टीव्ही चॅनेल, रेडिओ आणि रेल्वे स्थानकांवरही काम थांबल्याने सर्वत्र गोंधळ

0

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये अचानक झालेल्या बिघाड जगभरातील व्यवहार ठप्प
जगभरातील व्यवहार ठप्प -भारतासह २० देशांमध्ये विमानसेवेवर परिणाम, टीव्ही चॅनेल, रेडिओ आणि रेल्वे स्थानकांवरही काम थांबल्याने सर्वत्र गोंधळ

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये अचानक झालेल्या बिघाडामुळे शुक्रवारी रोजी जगभरात तांत्रिक सेवा ठप्प झाल्या आहेत. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि इतर २० देशांमध्ये वैद्यकीय सेवा आणि बँका यामील काम थांबल्याने गोंधळ उडला. तसेच टीव्ही चॅनेल, रेडिओ आणि रेल्वे स्थानकांवरही काम थांबल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
यामध्ये भारत, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या अनेक देशांमध्ये १ हजारांहून अधिक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या गोंधळामुळे ३ हजार विमाने उशिराने उडाली यामुळे प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागला. सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार भारतातील ६ एअरलाईन्स तांत्रिक समस्यांना तोंड देत असल्याचे दिसत आहे. या तांत्रिक समस्येमुळे दिल्ली विमानतळावर काही सेवा थांबल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याशिवाय ब्रिटनमधील अनेक स्टोअरमध्ये कार्ड पेमेंट सिस्टम ठप्प झाली. यामुळे पैसे न भरल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पॅरिस आॅलिम्पिक समितीनेही आयटी प्रणालीतील समस्येबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या संसदेतील कामकाजही ठप्प झाले आहे.
आरोग्य सेवांवर परिणाम
ब्रिटनमध्ये लहान मुलांसह लोक ३ तास विमानतळावर रांगेत उभे आहेत. नॅशनल हेल्थ सर्व्हिस, जी संपूर्ण ब्रिटनमधील आरोग्य सेवांसावरही परिणाम झाला. यामध्ये कोणतेही काम संगणकावर करता आले नाही. तसेच अमेरिकेतील लोक आपत्कालीन क्रमांक ९११ वर संपर्क साधू शकत नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.