समृध्दीवरील वृक्षारोपणासाठी लँडस्केप कंपनीकडे सीडबॉल सपुर्द

- पुणे येथील निसर्ग लँड कंपनीच्या अ‍ॅड. धन्नावत यांची माहिती

0

समृध्दीवरील वृक्षारोपणासाठी लँडस्केप कंपनीकडे सीडबॉल सपुर्द

– पुणे येथील निसर्ग लँड कंपनीच्या अ‍ॅड. धन्नावत यांची माहिती

जालना : नागपूर ते मुंबई या समृध्दी माहामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले असून या महामार्गाच्या दुर्तफा इनरव्हील होरायझनकडून वृक्षारोपण केले जाणार आहे. आता वृक्षरोपणासाठी लँडस्केप या कंपनीकडे ५ हजार सीडबॉल देण्यात आले आहेत. सीडबॉल निर्मितीसाठी समस्त महाजन ट्रस्टच्या नूतन देसाई यांनी मुंबई येथून उच्च प्रतीच्या सीडच्या दोन बॅग उपलब्ध करून दिल्याचे ग्रुपच्या अध्यक्षा अ‍ॅड. अश्विनी धन्नावत यांनी सांगितले.

या महामार्गांच्या निर्मितीवेळी परिसरातील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली होती. त्यामुळे झाडे जगवणे सर्वांसाठीच हितकारक असून ते आपले सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग संचालित मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील २०० विद्यार्थिनींकडून पाच हजार सीडबॉल तयार करून ते पुणे येथील निसर्ग लँड कंपनीचे झोनप्रमुख राजू शिंदे, चॅनल ३४७ ते ४५० चे प्रकल्प व्यवस्थापक पंकज पाटील व नितीन घोरपडे यांच्याकडे देण्यात आले. या वेळी क्लबच्या सचिव अ‍ॅड. पिंकी लड्डा, पूनम खंडेलवाल, वैष्णवी मिसाळ, सुनीती मदन यांची उपस्थिती होती. काम आहे, असे समजून प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे सांगण्यात आले.

वृक्षारोपण जनजागृती करावी लागेल

समृध्दी मार्गावर निसर्ग लँडस्केप कंपनीकडून वृक्षारोपण केले जात असले तरी झाडांना लावलेले तारेचे कुंपण व पाणी देण्यासाठी लावलेले ठिबक सिंचन काढून नेले जात असल्याने प्रकल्पप्रमुखांनी खंत व्यक्त केली. यासंदर्भात ग्रामस्थांमध्ये वृक्षारोपण व संवर्धनाबाबत जनजागृती करावी लागेल असे इनरव्हील होरायझनकडून सांगण्यात आले.

झाडे जगली तर समृध्दी नटेल

पाच वर्षांपर्यंत झाडे जगली तर पावसाचे प्रमाण वाढेल. समृद्धी महामार्ग हिरवळीने नटून जाईल, असा विश्वास क्लबच्या अध्यक्षा अ‍ॅड. अश्विनी धन्नावत यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.