कंगणा रणावतला भाजपकडून तंबी
-पक्षाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर बोलण्याची कंगणाला परवानगी नाही
नवी दिल्ली : नेहमी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी चर्चेत असणारी अभिनेत्री आणि खासदार कंगणा रणावत हीने केलेल्या शेतकरी आंदोलनविरोधी वक्तव्यामुळे भाजपने स्वत:ला ठेवत तंबी दिली आहे. भाजपने सोमवार रोजी एका लेखी निवेदनाच्या माध्यमातून म्हटले की, पक्ष कंगनाच्या विधानाशी सहमत नाही. कंगणा रणावतला पक्षाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर बोलण्याची परवानगी नाही. तसेच कंगणा रणावतला पक्षाच्या वतीने निवेदन देण्याचा अधिकार नसल्याचे भाजपने निवेदनाद्वारे कंगणाने या मुद्द्यावर आणखी कोणतेही वक्तव्य न करण्याची सूचना केली आहे.
आपल्या मुलाखतीत कंगणा रणावतने पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली बदमाश लोक हिंसाचार पसरवत असल्याचे वक्तव्य केले होते. तिथे बलात्कार आणि हत्या होत होत्या. आमचे सर्वोच्च नेतृत्व खंबीर राहिले नसते, तर शेतकरी आंदोलनात पंजाबचेही बांगलादेशात रूपांतर झाले असते. शेतकरी विधेयक मागे घेतले अन्यथा या भोंदूबाबांची खूप मोठी योजना होती. ते देशात काहीही करू शकतात, असे म्हटले होते. कंगणा रणावतने आपल्या मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर पंजाबमधील काँग्रेस नेते राजकुमार वेरका म्हणाले होते की, कंगना सातत्याने शेतकºयांवर अशी विधाने करत आहे. तिच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात यावा आणि तिच्यावर एनएसए लादण्यात यावे. तसेच काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, कंगनाने शेतकºयांना बलात्कारी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी तिच्यावर कारवाई करतील की साध्वी प्रज्ञाप्रमाणे तिलाही वाचवले जाईल.
कंगनाने आपल्या मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला गेला. यामध्ये शिरोमणी गुरुद्वारा प्रबंध कमेटीचे अध्यक्ष हरिजंदरसिंह धामी म्हणाले की, कंगनाविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात यावा. कारवाई करण्याऐवजी सरकार संरक्षण देत आहे. चित्रपटाद्वारे शिखांच्या धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. ट्रेलरनुसार शिखांचे चरित्र जाणूनबुजून दहशतवादी म्हणून दाखवले. तसेच आम आदमी पाटीर्चे नेते शेतकरी नेते प्रो. बुधराम म्हणाले की, भाजपने कंगनावर कारवाई केली पाहिजे, त्या भाजपकडून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी आहेत. यात भारतीय जनता पक्ष पूर्णपणे मागे आहे. हे थांबवण्याऐवजी पक्ष त्यांच्या पाठीवर थाप देतो. भाजपने कंगनावर कारवाई करावी, असे म्हटले. तर किसान मोर्चाचे नेते दर्शन पाल म्हणाले की, कंगना खासदार आहे, त्यांनी जबाबदारीने बोलावे. त्या वातावरण बिघडवत आहेत. अडचणीतील शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळू नका. सरकार शेतकºयांना संपवण्यासाठी कायदे आणत असल्यामुळे हे आंदोलन आहे, असे म्हटले.