आमदार राम कदम यांचा दहीहंडी आमदार म्हणून उल्लेख करीत जरांगेंचा निशाणा

मनोज जरांगे पाटील यांना नारायण राणे यांनी दिले आव्हान

0

आमदार राम कदम यांचा दहीहंडी आमदार म्हणून उल्लेख करीत जरांगेंचा निशाणा

मनोज जरांगे पाटील यांना नारायण राणे यांनी दिले आव्हान

जालना : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांना नारायण राणे यांनी आव्हान दिल्यानंतर ते म्हणाले की, राणेंबद्दल मी काही बोलत नाही. त्यांनी उगाच मला धमक्या देऊ नये. यावेळी जरांगे त्यांनी भाजप आमदार राम कदम यांनाही खडे बोल सुनावले. या वादात उडी घेऊ नये असे ते म्हणाले आहेत. आमदार राम कदम यांचा दहीहंडी आमदार म्हणून उल्लेख करीत मनोज जरांगे यांनी निशाणा साधल्याने उपस्थितांमध्ये हस्यकल्लोळ पहायला मिळाला.

यावेळी मनोज जरांगे हे नारायण राणे यांच्याबद्दल म्हणाले की, मी नारायण राणेंना मानतो. निलेश राणेंनी त्यांना समजावून सांगावं, मी नारायण राणेंना काही बोलत नाही, शांत आहे. बोलायला लागलो तर मी थांबणार नाही. नारायण राणेंनी मला उगाच धमक्या देऊ नयेत. नारायण राणेंनी काय किंवा इतर कुणी काय मला फुकट धमक्या देऊ नयेत. मी कुणालाही भीत नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. यावेळी त्यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता त्यांना इशारा दिला आहे. मी ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. माझा मराठा समाजही आरक्षण ओबीसीतूनच घेणार आहे, असे म्हणाले.

सरकार जातं की राहतं याची त्यांना चिंता

सध्या काय झालं आहे की सत्ताधारी पक्षातील आमदारांना काहीही सुचत नाही, त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. आपलं सरकार जातं की राहतं याची त्यांना चिंता वाटते आहे. मला उचकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मी त्यांना उत्तर देणार नाही. मी त्यांचासारखा स्वाभिमान गहाण ठेवणारा नाही. मला मराठा समाजाला मोठं करायचं आहे, असे मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

कुणी काय दिलं नाही ते सगळ्यांना माहीत

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आमदार राम कदम यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, त्यांच्याबद्दल चांगलं मत असताना त्यांनी कशाला यात उडी घ्यावी. सध्या सत्ताधारी पक्षातील आमदारांना काय झाले माहीत नाही. ४० वर्षे, ७० वर्षे कुणी काय दिलं नाही ते सगळ्यांना माहीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.