अमरावतीमध्ये असणारा महायुतीचा वाद चव्हाट्यावर  – आनंदराव अडसूळ

आनंदराव अडसूळ यांची अमित शहांकडून फसवणूक

0

अमरावतीमध्ये असणारा महायुतीचा वाद चव्हाट्यावर  – आनंदराव अडसूळ

– आनंदराव अडसूळ यांची अमित शहांकडून फसवणूक

अमरावती : राज्यपाल पदाच्या नियुक्तीवरुन महायुतीतमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना नेते आनंद अडसूळ यांनी भाजपवर राज्यपाल पदाचे आश्वासन देऊन विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. त्यात शिवसेना नेते अभिजित अडसूळ यांनी थेट माजी खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणांवर निशाणा साधत महायुतीला इशारा दिला आहे. यापूर्वी शिवसेना नेते आनंद अडसूळ यांनी माजी खासदार नवनीत राणा यांच्या जात वैधतेला आव्हान दिले होते. त्यात आनंद अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनी रवी राणा यांच्यावर जोरदार हल्ला केल्याचे समोर येत आहे.

आनंद अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनी, रवी राणा सारखे छपरी लोक महायुतीमध्ये असतील तर आम्ही बाहेर निघू, अशी राणा दाम्पत्यावर टीका करीत भाजपला इशारा दिला आहे. यावेळी रवी राणा यांचे वक्तव्य अतिशय बालिशपणाचे आणि संसदीय असल्याचे अभिजीत अडसूळ यांनी सांगितले. तसेच राज्यपाल पदाच्या वादावर बोलताना अभिजीत अडसूळ म्हणाले की, अमरावती लोकसभेची जागा आनंदराव अडसूळ यांनी लढू नये. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला राज्यपाल पद देतो असं पत्र मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शहा यांच्याकडे दिलं होतं. तेव्हा अमित शाह यांच्या विनंतीला मान देत लोकसभेची निवडणूक लढवली नाही. पण आज जर ते लढले असते तर निवडून आले असते, असं अभिजीत अडसूळ म्हणाले. यामुळे युतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

अभिजीत अडसूळ यांनी काल एका ठिकाणी बोलताना देखील जाहीर नाराजी व्यक्त केली. कारण अमित शाह यांनी स्वतः मार्च महिन्यात आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल करणार, असा शब्द दिला होता. परंतू राजपाल यांच्या यादीमध्ये आनंदराव अडसूळ यांचे नाव का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच महायुतीकडून आमच्यावर अन्याय झाला, असा आरोप त्यांनी केला होता.

आम्ही महायुतीत रहायचं का नाही

तसंच बच्चू कडू हे रवी राणांमुळे महायुतीतून दूर गेलेत. राणांना महायुतीतून बाहेर काढा, अन्यथा आम्ही महायुतीत रहायचं का नाही हे तरी सांगा, असा संतप्त सवाल अभिजीत अडसूळ यांनी केला होता. आज तर त्यांनी थेट महायुतीतून बाहेर पडण्याचं विधान केलं आहे. त्यामुळे सध्या राज्यात याची जोरदार चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.