बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी आंदोलनाचा भडका

आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने कर्फ्यू लागू

0

बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी आंदोलनाचा भडका

आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने कर्फ्यू लागू

ढाका : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आरक्षण विरोधी आंदोलनाचा भडका उडाला आहे. यामध्ये सरकारी नोकºयांमधील आरक्षणाचा कोटा ८० टक्कयांपर्यंत वाढवण्याच्या विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनामुळे देशभर कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे सरचिटणीस ओबेदुल कादर यांनी शुक्रवारी कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली. तसेच या हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी लष्कराला तैनात करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात बांगलादेशात आंदोलन
लाडका भाऊ योजनेसाठीचे फक्त हेच युवक पात्र
UPSC चेअरमन Manoj Soni यांनी दिला राजीनामा – हे दिले कारण

राजधानी ढाकामध्ये मेळाव्यावर सरकारने बंदी घातली आहे. या आंदोलनादरम्यान पोलिस आणि सुरक्षा कर्मचाºयांनी आंदोलकांवर गोळीबार केल्यानंतर हसीना यांच्या सरकारने कफ्यूर्ची घोषणा केली. यामध्ये १०५ लोक मारले गेल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी आंदोलकांनी शुक्रवारी नरसिंगदी जिल्ह्यातील तुरुंगावर हल्ला केला. कारागृहातून शेकडो कैद्यांची सुटका केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी आग लावली. याआधी शेकडो आंदोलकांनी बीटीव्ही कार्यालयाच्या परिसरात घुसून ६० हून अधिक वाहने जाळली.

या आठवड्यात विद्यार्थी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात आतापर्यंत किमान १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. २,५०० हून अधिक जखमी झाले आहेत. इंडिपेंडंट टेलिव्हिजनने एकट्या शुक्रवारी १७ मृत्यूची नोंद केली. सोमोय टीव्हीने ३० जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केल्याचे रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीतून समोर आले आहे. तसेच असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टरने ढाका मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये २३ मृतदेह पाहिले. यापूर्वी गुरुवारी रोजी २२ जणांचा मृत्यू झाला होता.

दररोज पोहण्याचे 8 फायदे पहाच
महाराष्ट्रातील लोकप्रिय कुंभे धबधब्यावर पडून सोशल मीडिया Influencer Anvi Kamdar मृत्यू झाला

४०५ भारतीय विद्यार्थी घरी परतले

मेघालयाचे मुख्यमंत्री संगमा यांनी शुक्रवारी सांगितले की, भारतीय विद्यार्थ्यांना बांगलादेशातून डोकी एकात्मिक चेक पोस्टद्वारे बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी सुमारे ८० विद्यार्थी मेघालयातील आहेत तर बाकी इतर राज्यांतील आहेत. नेपाळ आणि भूतानमधील काही विद्यार्थी आणि पर्यटकांनाही बाहेर काढण्यात आले आहे. बांगलादेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ४०५ भारतीय विद्यार्थी त्यांच्या घरी परतले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.