हनुमानवाडीतील रस्ता तहसीलदारांच्या पुढाकाराने मोकळा

0

हनुमानवाडीतील रस्ता तहसीलदारांच्या पुढाकाराने मोकळा

 

वैजापूर : तालुक्यातील कापूसवाडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वहिवाटा, हनुमानवाडीचा रस्ता मोकळा झाला आहे. यासाठी भुमिका तहसीलदार सुनील सावंत यांनी पुढाकार घेतला. हा रस्ता मोकळा केल्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सोयीस्कर झाले आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व विद्यार्थ्यांच्या पालकांनी ही वहिवाट मोकळी करून देण्याची मागणी केली होती. कापूसवाडगाव – पुरणगाव रस्त्यालगत गट क्रमांक १७४ व २१३ या दोन ठिकाणी वेडीबाभळी झाडामुळे वाटचालीसाठी अडचण निर्माण झाली होती. यामुळे रस्त्यावरील झाडाझुडपांचा अडथळा दूर करुन या ठिकाणी चिखल होवू नये याकरिता मुरुमाचा भराव टाकण्याची मागणी केली होती.

तहसीलदार सुनील सावंत यांनी महसूल मंडळ अधिकारी व तलाठी यांना रस्त्याची पाहणी करुन दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अवघ्या तासाभरात जेसीबी यंत्राने रस्त्याची डागडुजी करण्याची कारवाई महसूल विभागाच्या यंत्रणेने केल्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या तत्परतेने दखल घेतल्याबद्दल आभार मानले. यामुळे आता विद्यार्थ्यांचीही शाळेत जाण्याची हनुमानवाडीचा रस्ता/वाट मोकळी झाली आहे. त्यांना शाळा गाठण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे याकडे लक्ष देऊन काम करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.