महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कामे खोळंबली
-५ हजार ६०० प्रमाणपत्रे ऑनलाईन परवानगीअभावी प्रलंबित
बीड : जिल्ह्यात शेतकरी, लाडकी बहीण आणि विद्यार्थ्यांची सेवा सेतू केंद्रावर कागदपत्रे काढण्यासाठी गर्दी होत आहे. गेल्या ९ दिवसांपासून महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केल्याने सर्वसामान्यांची कामे खोळंबली आहेत. महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मंगळवारपर्यंत फक्त बीड तालुक्यातील तब्बल ५ हजार ६०० प्रमाणपत्रे क्लर्क, अव्वल कारकून, नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांच्या ऑनलाईन परवानगीअभावी प्रलंबित आहेत.
आजपासून वंचितची आरक्षण बचाव यात्रा आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची घोषणा
नेत्यांनो पंतांची निष्ठा म्हणजे विष्ठा !
संपाच्या सातव्या दिवशी बीडच्या तहसीलदारांनी पर्यायी व्यवस्था करत काही कोतवालांना आपल्या कक्षात बसवून प्रलंबित कामे करण्याच्या सूचना दिल्यानंतर बीड तालुक्यातील ८०० प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. मात्र मंगळवारी सकाळी महा ऑनलाईन पोर्टल ओपन झाले. तेव्हा केवळ २० प्रमाणपत्राचे काम झाले. त्यानंतर दिवसभर पोर्टल बंद असल्याने काम खोळंबले होते. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच सेतू सेवा केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे.
सेतू सुविधा केंद्रातून महसूल विभागाकडे पाठवलेले प्रमाणपत्र १ जुलैपासून महा ऑनलाईन पोर्टल चालत नसल्याच्या नावाखाली हे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले नाही. तर १५ जुलैपासून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी काम बंद संप पुकारला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे खोळंबली आहेत.
भटांची पिल्ले वैमानिक अन् आमची मंदीराच्या लाईनीत
राजर्षी शाहू महाराज वेदोक्त प्रकरण व मराठा आरक्षण
ऑनलाईन परवानगी देणे सुरू
कर्मचाऱ्यांच्या संप कालावधीमध्ये कामे प्रलंबित राहू नयेत यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली महाऑनलाईन पोर्टलच्या ४ डेस्कवरून ऑनलाईन परवानगी देणे सुरू आहे. मात्र हे पोर्टल व्यवस्थित चलत नसल्याने अडचणी येत आहेत, असे बीडचे तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी म्हणाले.
कामासाठी चकारा
माझ्या वडिलांच्या नावे रेशनकार्ड असून वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबप्रमुख म्हणून पत्नीचे नाव रेशनकार्डवर लावायचे आहे. त्यासाठी मी गेल्या चार वषार्पासून पुरवठा विभागात चकरा मारत आहे. आज या, उद्या या म्हणून माझे काम करत नाहीत, असे -अशोक वाघमारे हे म्हणाले.