रोजगार हमी योजनेच्या रक्कमेसाठी ठिय्या आंदोलन

आंदोलकांकडून कर्मचाऱ्यांच्या कामावर टीका

0

रोजगार हमी योजनेच्या रक्कमेसाठी ठिय्या आंदोलन

– आंदोलकांकडून कर्मचाऱ्यांच्या कामावर टीका

 

फुलंब्री : तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कामात पैसे देऊनही काम होत नसल्याची अनेक तक्रारी समोरीत असून याच माध्यमातून किशोर बलांडे यांनी गुरुवार रोजी पंचायत समिती रोजगार हमी योजना विभागात शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करत रोजगार हमी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कामावर टीका केली.

शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी शासनाने रोजगार हमीच्या माध्यमातून विविध योजना शेतकऱ्यांसाठी अमलात आणले आहे. यामध्ये रेशीम उद्योग, सिंचन, विहीर, गाय-गोठा असे विविध योजना या माध्यमातून राबवण्यात येत आहे. ही योजना जरी चांगली असली परंतू कर्मचाऱ्यांमुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी हेळसांड होणारी असून ही योजना नसती घेतली तर बरे झाले असते, असे म्हणण्याची वेळ फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. या योजनेसाठी काम करणारे सर्व कर्मचारी कंत्राटी असून यामुळे ते नुसतेच शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्याचे काम करीत आहे. ही साखळी रोजगार सेवकापासून तर पार संबंधित इंजिनियरपर्यंत असल्याचा आरोप शेतकरी करत आहे. फुलंब्री तालुक्यात सुमारे दोन हजार शेतकऱ्यांना गाय गोठे व सिंचन विहीर मंजूर झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांचे यात गाय गोठ्याचे काम पूर्ण झाले असून सिंचन विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

हे पण वाचा

जनआंदोलन उभारण्याचा इशारा

पंचायत समिती रोजगार हमी विभागात पैसे देवून ही बांधकामांचे पैसे मिळत नसल्याची समस्या मांडताना शेतकऱ्यांसह किशोर बलांडे म्हणाले की, शासन तुम्हाला पगार देत नाही का? तुम्ही पैसे का जमा करतात. येत्या सात दिवसात शेतकऱ्यांचे बिले ऑनलाईन न केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.