प्रहारच्या आक्रोश मोर्चामुळे ट्राफीक जॅम झाल्याने शहराला मनस्ताप

0

प्रहारच्या आक्रोश मोर्चामुळे ट्राफीक जॅम झाल्याने शहराला मनस्ताप

-मुख्य रस्त्यावर तीन किलोमीटरच्या रांगा

छत्रपती संभाजीनगर : आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारने आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चाला किती गर्दी होईल याचा अंदाज न आल्याने संपूर्ण शहरात शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी प्रहारच्या आक्रोश मोर्चामुळे ट्राफीक जॅम झाल्याने संपूर्ण शहराला मनस्ताप सहन करावा लागला. यावेळी शहरातील मुख्य रस्त्यावर तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या. मोर्चाला आलेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच पार्कींग गेल्यामुळे शहरात अजून अडचण झाली.

प्रहारच्या आक्रोश मोर्चामुळे शहरात येण्यासाठी असलेले चेकपोस्ट देखील तासभर जॅम होते. दुपारी एक वाजता मोर्चा क्रांती चौकातून निघणार होता. यासाठी सकाळी दहा वाजेपासूनच राज्यातील विविध जिल्ह्यातून ट्रॅव्हल्स, क्रुझर आणि कारने लोक येण्यास सुरुवात झाली होती. मात्र पोलिसांनी बाहेरहून आलेल्या वाहनांची पार्कींग आणि कुठले मार्ग बंद असावे या बाबत कुठलेही नियोजन न केल्याने सर्वत्र गोंधळ झाल्याचे समोर आले. यामुळे शहरातील जालना रोड बरोबरच, सिडको, टिव्ही सेंटर, जवाहर नगर, बीड बायपास, मुकुंदवाडी या भागातील रस्ते देखील जॅम झाले होते.

प्रहारच्या आक्रोश मोर्चामुळे ट्राफीक जॅम झाल्याने शहराला मनस्ताप: प्रहारचा आक्रोश मोर्चा हा क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत काढला गेला. यामध्ये एक वाजता सुरु होणार मोर्चा दुपारी तीनच्या सुमारास सुरू झाला. हा मोर्चाला सुरूवात होताच पाऊस सुरु झाला. यादरम्यान या मोर्चाला परवानगी न मिळाल्यामुळे पहिले सिल्लेखाना चौकात कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. अखेर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर भाषण झाले. दरम्यान बाहेरुन आलेल्या कार्यकर्त्यांना ज्या ठिकाणी जागा मिळाली त्या ठिकाणी गाड्या लावल्या त्यामुळे कोंडी वाढली.

रुग्णवाहिका अडकल्याने नातेवाईकांना त्रास

प्रहारच्या आक्रोश मोर्चामुळे ट्राफीक जॅम झाल्याने शहराला मनस्ताप: आक्रोश मोर्चाला दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने आल्यामुळे शहरता जवळपास तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या कोंडीमुळे शहरातील अनेक मुख्य रस्त्यावर रुग्णवाहिका अडकून पडल्याने रूग्णाच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागला. या शिवाय शाळेच्या बसना सुद्धा विद्यार्थ्यांना घरी सोडण्यास उशीर झाल्याने पालकांना ही त्रास सहन करावा लागला.

Leave A Reply

Your email address will not be published.