उद्धव ठाकरे यांच्यात बाळासाहेबांचा गुणधर्म उरला नाही – प्रतापराव जाधव यांची टीका
-केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरे यांच्यात बाळासाहेबांचा गुणधर्म उरला नाही – प्रतापराव जाधव यांची टीका
-केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची ठाकरेंवर टीका
जालना : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे सत्तेच्या मोहापायी दिल्लीत काँग्रेसच्या चिल्लर लोकांपुढे लोटांगण घालीत आहेत. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा एकही गुणधर्म त्यांच्यात उरला नाही. ते शंभर टक्के सेक्युलर झालेत, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली.
Old Pension Scheme (OPS) जुनी पेन्शन योजना मागणीसाठी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा मोर्चा
शिक्षक समन्वय समितीच्या वतीने पंचायतसमोर आंदोलन
शहरातील मोकाट जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ
माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आयोजित केलेल्या नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार संदिपान भुमरे, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी दानवेंचे नाव टाळत जळगाव- जालना रेल्वेमार्ग मंजूर होऊन त्यासाठी निधीची तरतूद करण्याचा निर्णय झाला. जळगाव-जालना रेल्वेमागार्चे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हेच खरे शिल्पकार आहेत, असे म्हणत मंत्री सत्तार यांनी माजी मंत्री दानवेंचे नाव घेणे टाळले.
ठाकरे गप्प कसे?
उद्धव ठाकरे हे आज शंभर टक्के सेक्युलर झाले आहेत. बांगलादेशमधील हिंदूंची कत्तल होत असताना ते गप्प आहेत. खरी शिवसेना ही सामान्य शिवसैनिकांनी वाढवली, असे जाधव म्हणाले.