विनेश फोगाटची CAS (Court of Arbitration for Sports) मध्ये धाव

-आज दुपारी १२.३० वाजता सुनावणी होणार

0

विनेश फोगाटची CAS (Court of Arbitration for Sports) मध्ये धाव

-आज दुपारी १२.३० वाजता सुनावणी होणार

पॅरिस : येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची पैलवान विनेश फोगाट ५० किलो वजनी गटात कुस्ती खेळण्यासाठी गेली होती. मात्र ऐनवेळी तिच्या वयजनात नियमापेक्षा १०० ग्रॅम वाढ झाल्याने तिला अपात्र ठरविण्यात आले होते. त्यामुळे विनेश फोगाटच्या पदक विजयाच्या जल्लोष साजरा करण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रीडा प्रेमींना यामुळं मोठा धक्का बसला. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांच्याशी चर्चा केली. यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटातील स्पर्धेत रौप्य पदक दिलं जावं या मागणीसाठी विनेशने CAS (Court of Arbitration for Sports) कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये अर्ज केला होता. तिचा अर्ज स्वीकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटनं 50 किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात रौप्य पदक देण्यात यावं अशी मागणी केली आहे. विनेशला CAS (Court of Arbitration for Sports) कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट कडून मोठा दिलासा मिळाला आहे. कुस्तीपटू विनेश फोगट हिचा अर्ज सुनावणीसाठी स्वीकारला आहे. यावर उद्या सुनावणी होणार आहे. कुस्ती सामन्यापूर्वी विनेशला अपात्र ठरविल्यानंतर तिने, आई कुस्ती माझ्याविरुद्ध जिंकली आणि मी पराभूत झाली. तुझं स्वप्न, माझी हिम्मत सर्व तुटलंय, यामुळं माझ्यामध्ये अधिक ऊर्जा राहिली नाही. कुस्तीमधील २००१ ते २०२४ च्या प्रवासाला अलविदा, तुम्हा सर्वांची ऋणी राहीन, असं म्हटलं होत.

आज दुपारी १२.३० वाजता सुनावणी होणार

विनेशने आपल्या अपात्रतेविरुद्ध सीएएस CAS (Court of Arbitration for Sports) मध्ये अपील दाखल केलं होतं. विनेशच्या याचिकेनुसार तिनं सीएएस कडे संयुक्त रौप्य पदकाची मागणी केली आहे. विनेश फोगाटच्या अर्जावर कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टनं सुनावणी करण्यासाठी वकिलाची नियुक्ती करण्यास सांगितली आहे. विनेश फोगाटच्या अर्जावर भारतीय वेळेनुसार आज दुपारी १२.३० वाजता सुनावणी होणार आहे.

विनेशची कुस्तीतून निवृत्ती

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जे घडलं त्यानंतर भारताची पैलवान विनेश फोगाट हिनं आंतरराष्ट्रीय कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट करत तिने आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.

Leave A Reply

Your email address will not be published.