मायदेशी परतलेली विनेश फोगट लढा सुरूच ठेवणार

सहकारी कुस्तीपटू साक्षी मलिकला मिठी मारल्यानंतर अश्रु अनावर

0

मायदेशी परतलेली विनेश फोगट लढा सुरूच ठेवणार

-सहकारी कुस्तीपटू साक्षी मलिकला मिठी मारल्यानंतर अश्रु अनावर

नवी दिल्ली : नुकत्याच पॅरिस येथे पार पडलेल्या ऑलिम्पिकमधील अंतिम कुस्ती सामन्यापूर्वी अपात्र ठरलेली विनेश फोगट आपल्या देशात परतली आहे. ती शनिवार रोजी ११ वाजण्याच्या सुमारास दिल्ली विमानतळावरून बाहेर आली. यावेळी तिने आपली सहकारी कुस्तीपटू साक्षी मलिकला मिठी मारल्यानंतर रडू लागली. हातात तिरंगा घेऊन विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी दिल्ली विमानतळाबाहेर एकजूट दाखवली. यावेळी विनेशने मंचावरून वचन दिले की, ती आपला लढा सुरूच ठेवेल आणि आपल्या वडिलांना कधीही झुकू देणार नाही.

दिल्ली विमानतळावर स्वागत पाहून विनेश म्हणाली, संपूर्ण देशाचे खूप खूप आभार, मी खूप भाग्यवान आहे. यानंतर बादली, झज्जरमध्ये ती म्हणाली की, कालपर्यंत मी स्वत:लाच कोसत होते, पण आज मी म्हणू शकते की या जगात माझ्यापेक्षा भाग्यवान कोणी नाही. गोल्ड नाही मिळालं तर काय, पण आज देशाकडून जे प्रेम मिळतंय ते सोन्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.

मायदेशी परतलेली विनेश फोगट लढा सुरूच ठेवणार:

दिल्ली विमानतळ ते विनेशच्या मूळ गाव बलाली पर्यंत सुमारे १२५ किलोमीटरच्या मार्गावर ठिकठिकाणी तिचे स्वागत केले. विनेशच्या ताफ्यात जवळपास ३० वाहने होती. विनेशच्या ताफ्याने साडेपाच तासांत ७० किमीचे अंतर कापले या आंतरात २२ ठिकाणी गौरव करण्यात आला आहे. बलाली गावातील क्रीडा स्टेडियममध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, एक दिवस आधीच आचारसंहिता लागू झाल्याने राज्य सरकार या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नसल्याचे दिसत आहे.

विनेशचा भाऊ हरवेंद्र फोगाटने सांगितले की, विनेशच्या कार्यक्रमाचा संपूर्ण रूट मॅप तयार करण्यात आला आहे. विनेश पदकापासून वंचित राहिली असली तरी संपूर्ण देशाचा आवाज आणि आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे. काही दिवसांपूर्वी सीएम नायब सैनी यांनी विनेशला 4 कोटी रुपये आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली होती.

कार्यक्रमाला आलेल्यांसाठी तुपाचे पदार्थ

बलाली गावचे माजी सरपंच राजेश सांगवान यांनी सांगितले की, विनेशच्या कार्यक्रमाला येणाºया सर्वांसाठी देशी तुपाचे पदार्थ तयार केले जात आहेत. खेळाडू, प्रशिक्षक आणि इतर लोकांना पैलवानांचा आहार दिला जाईल. विनेशचा सुवर्ण विजेत्याप्रमाणेच सन्मान केला जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.