विनेश फोगाट स्पर्धेत अपात्र होण्याचे नेमके कारण काय?
– कोट्यावधी भारतीयांच्या आनंदावर विरजन
पॅरिस : सध्या सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक भेटेल या आसेवर असलेल्या भारतीयांना मंगळवारी रात्री मोठा दिलासा मिळाला. भारताच्या विनेश फोगाटने उपांत्य फेरीच्या सामन्यात क्यूबन कुस्तीपटू गुझमन लोपेझचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मात्र दुसऱ्याच दिवशी कोट्यावधी भारतीयांच्या आनंदावर विरजन पडले. या स्पर्धेत विनेशला अपात्र ठरवण्यात आल्याची घोषणा झाली, अशी माहिती समोर आली. याविषयी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने सांगितले की, आहे. ५० किलो गटात खेळणाऱ्या विनेशचे वजन १०० ग्रामने वाढल्याने ती या स्पर्धेतून बाद केले. मंगळवारी तिला अपात्र ठरवण्यात आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले की, मी अनुभवत असलेल्या निराशेची भावना शब्दांत व्यक्त करता यावी अशी माझी इच्छा आहे, अशी प्रतिक्रीया दिली आहे.
हे पण वाचा
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 23 टक्कयांवर?
अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ
कन्नड शहरात ई-पॉस मशीनची अंत्ययात्रा
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 23 टक्कयांवर?
अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ
कन्नड शहरात ई-पॉस मशीनची अंत्ययात्रा
ऑलिम्पिक संघटनेने विनेशला फ्रीस्टाइल महिला कुस्तीसाठी अपात्र घोषित केले. मात्र जागतिक प्रसारमाध्यमांनी विनेशच्या या पराभवाचे परीक्षण केल्याचे दिसत आहे. यामध्ये अमेरिकन मीडिया हाऊस सीएनएनने विनेशच्या पराभवावर लिहिले की, अपेक्षा, परिश्रम आणि संयमाने विणलेली विनेशची ऑलिम्पिक कहणी हार्टब्रेकमध्ये बदलली. याशिवाय मीडिया हाऊसने स्पष्ट शब्दात लिहीले की, लैंगिक छळाच्या विरोधात लढा देणारी विनेश फोगाट ५० किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या सामन्यातून बाहेर काढली गेली. याशिवाय रॉयटर्सने लिहिले की, विनेश फोगाटचा अंतिम सामना अमेरिकन कुस्तीपटू सारा हिल्डेब्रंटसोबत होणार होता. तिला आधीच अपात्र ठरवण्यात आले आहे, आता तिला कोणत्याही रंगाचे पदक मिळणार नाही. या बातमीने देशभरातील लोक तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत. तर कतारच्या मीडिया हाऊस अलजझीरानेही विनेश फोगाटचा ऑलिम्पिक प्रवास कव्हर केला आहे. गेल्या वर्षी ब्रिजभूषण विरुद्धच्या तिच्या कामगिरीचा हवाला देत मीडिया हाऊसने लिहिले आहे की, विनेशचा ऑलिम्पिकमधील संघर्ष केवळ पदकासाठी नव्हता, तर हरियाणाच्या मुलींची स्वप्ने वाचवण्यासाठी होता, अशी प्रतिक्रीया नोंदवली आहे.
विनेश ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला
तिने फ्री स्टाइल कुस्तीमध्ये जगातील सर्वोत्तम कुस्तीपटू युई सुसाकीचा पराभव केला होता. ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. मंगळवारी तिच्या नशिबाने वाईट वळण घेण्यापूर्वी, इतक्या अडचणींचा सामना केल्यानंतर आपण रौप्य किंवा सुवर्णपदक नक्कीच मिळवू, असा तिला विश्वास होता. मागील वर्षी पोलिसांनी तिला ओढत कोठडीत नेले, असे अमेरिकन मीडिया हाऊसने म्हटले आहे.
यापूर्वी अपात्र ठरलेला अरश इराणसाठी चॅम्पियन
याआधी इराणचा ज्युडोपटू अरश मिरेसमेलीलाही २००४ च्या ऑलिम्पिक स्पर्धत जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. यावेळी इराणच्या ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष नसरुल्लाह साजदी यांनी सरकारला आवाहन केले होते की अरशला ११५ हजार डॉलर्सचे बक्षीस द्यावे. तर इराणचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद खतामी म्हणाले होते की, इस्रायलचा सामना करण्यास नकार दिल्यानंतर अरशचे नाव देशाच्या इतिहासात नोंदवले गेले आहे. इराण त्याला आॅलिम्पिक स्पर्धेचा चॅम्पियन मानतो.