शेतीच्या योजनांसंदर्भात घोटाळ्याचे काय झाले?
खा. सुप्रिया सुळे यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल
शेतीच्या योजनांसंदर्भात घोटाळ्याचे काय झाले?
खा. सुप्रिया सुळे यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल
पैठण : राज्यात शेतीच्या योजना मध्ये ११८ कोटींचा घोटाळा झाल्याचा पुरावे संघाच्या जेष्ठांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले त्याचे काय झाले याचे उत्तर फडणवीस यांनी द्यावे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पैठणमधून विचारला आहे. त्या पैठण येथे गुणवंतांचा सत्कार व मेळाव्यानिमित्त आल्या होत्या.
माजी आमदार संजय वाघचौरे यांनी आयोजित केलेल्या गावनिहाय शेतकरी, शेतमजूर जनसंपर्क अभियानाला खासदार सुळे या उपस्थित होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, आम्ही लोकसभेच्या निकालानंतर तात्काळ विधानसभेची तयारी सुरू केली आहे. आमच्या पक्षाचे चिन्ह, नाव चोरून घेऊन गेले मात्र याच संघषार्तून नव्याने आम्ही उभे राहत आहोत. नुकतेच संघाच्या वरिष्ठानी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर अद्याप दिले नाही. हिम्मत असेल तर त्यांनी ते सांगावे असे फडणवीस यांना त्यांनी आवाहन केले. फौजिया खान, राजेश टोपे, महेबुब शेख, पांडुरंग तायडे, उमेश पंडुरे, विशाल वाघचौरे, ज्ञानेश्वर कापसे यांच्या उपस्थित होती.
हे पण वाचा
मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता
पिकावरील बुरशी प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त
लाडका भाऊ योजनेसाठीचे फक्त हेच युवक पात्र
दुबईपेक्षा महाराष्ट्रात बघण्यासारखे आहे
आगामी काळात सरकार आपल असणार आहे त्यानंतर सर्वात जास्त पर्यटक महाराष्ट्रातील अजिंठा-वेरुळला येतील, मी दुबईला कधीच जाणार नाही येथे काही नाही त्याच्या पेक्षा महाराष्ट्र अधिक बघण्यासारखे आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
संविधान वाचविण्याचे काम करणार
सध्या देखील देशात दडपशाही सुरू आहे, दडपशाही चालू देणार नाही, संविधान बदण्यासाठी भाजप बसले आहेत. आम्ही संविधान वाचवण्याचे काम आम्ही करणार आहोत, असे सांगितले.
शिष्टमंडाकडून सुळेंची भेट
विधानसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघाची जागा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्याची मागणी येथील प्रमुख पदाधिका-यांच्या शिष्टमंडळाने खा.सुप्रिया सुळे यांच्याकडे केली.