What Is (UPS) Unified Pension Scheme? केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजनेला दिली मंजूरी

0

What Is (UPS) Unified Pension Scheme? केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजनेला दिली मंजूरी

सुमारे 23 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे

जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्षे काम केले असेल, तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या किमान 50 टक्के नक्कीच मिळेल.

पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यूच्या वेळी मिळालेल्या पेन्शनपैकी 60 टक्के रक्कम मिळते.

जर 10 वर्षांनी नोकरी सोडली तर कर्मचा-यांना 10,000 रुपये पेन्शन मिळेल.

कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPS यापैकी एक निवडण्याचा पर्याय असेल

सध्या कर्मचाऱ्यांचा 10 टक्के वाटा आहे तर केंद्र सरकारचा 14 टक्के हिस्सा आहे. मात्र यापुढे केंद्र सरकार 18 टक्के हिस्सा असेल.

नवीन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे

Unified Pension Scheme

जुनी पेन्शन (OPS) व सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना यामधील लाभांचा तुलनात्मक तक्ता

UPS
Unified Pension Scheme

Unified Pension Scheme
जुन्या पेन्शन योजनेतील १० लाभांपैकी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र निमंत्रित राज्यातील शासकीय-निमशासकीय कर्मचारी व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या दोन बेमुदत संप लढ्यातून आजवर १० पैकी ८ लाभ मिळविले आहेत. १९८२ च्या जुन्या पेन्शन योजनेतील सर्व तरतुदींची पेन्शन योजना आम्हाला मिळावी. हि मागणी यापूर्वीही होती व आजही आहे. मात्र प्रथम, मिळत असलेले लाभ प्राप्त करून घेऊन उर्वरित लाभांसाठी प्रयत्न करत राहणे अधिक शहाणपणाचे होते. मात्र उर्वरित लाभांसाठी आपण यापुढेही प्रयत्नशील राहणार आहोत.
अपप्रचारी माहिती जाणीवपूर्वक पसरवली जाणार. मात्र वस्तुस्थिती व अपप्रचार या दोन्हींची तुलना करून विकल्प आपणांस ठरवायचा आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ मधील तरतुदी प्रकरण निहाय बदलतात त्यामुळे २० पेक्षा कमी सेवा झालेल्या कर्मचार्यांनी आपल्या नियत वयोमानानुसार मिळणाऱ्या लाभाबाबत महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ व आपल्या नजीकच्या पेन्शन माहितीगारशी संपर्क साधून आपणांस मिळणाऱ्या रक्कम प्रमानांचे कॅल्कुलेशन करून घ्यावे.

वरील सर्व माहिती, तक्ता हा श्री. गणेश देशमुख, कोषाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी शेअर केलेल्या पोस्ट मधील आहे. या माहितीवर gramonnati.com कसल्याही प्रकारचा अधिकार ठेवत नाही.

केंद्राने जाहीर केली Unified Pension Scheme (UPS), 1 एप्रिल 2025 पासून होणार लागू

Leave A Reply

Your email address will not be published.