कॅरीबॅग वापरावर बंदी असताना संभाजीगनरात खुली विक्री
– विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
छत्रपती संभाजीगनर : ५१ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या राज्यात कॅरीबॅग वापरावर बंदी आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या हद्दीत याची खुल्या प्रमाणात विक्री होताना दिसत आहे. ५१ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग वापरावर महापालिका हद्दीत बंदी असतानाही शहरातील मेडिकल, किराणा दुकान, भाजी विक्रेते यांच्याकडून सर्रासपणे विक्री सुरू आहे.
ग्राहकांच्या हातात ५१ मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिक कॅरीबॅग सामानासोबत दिली जात आहे. यामुळे शहरातील सर्व भागांतील नागरिकांच्या हातात सर्वत्र कॅरीबॅग दिसत आहेत. शहरातील नियम मोडणाऱ्यां विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जलसमाधी आंदोलन
छत्रपती संभाजीनगर शहरातील १४ सिग्नल बंद बेशिस्त वाहतूक
यापूवीर्ही सातत्याने कमी जाडीच्या कॅरीबॅगचा वापर करू नये, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले होते. कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर आणि विक्री करणाऱ्यांवर यापूवीर्ही कारवाई करण्यात आली होती. मात्र व्यापाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष कानाडोळा केला जातो. या कमी जाडीच्या कॅरीबॅगमुळे पोटाचे आजार होण्याची शक्यता असते. २० दिवसांत दोन क्विंटलपेक्षा अधिक ५१ मायक्रॉनच्या कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या आहेत.
जायकवाडी धरणात 4.13 टक्के पाणीसाठा
चिकलठाण्यात गांजा विक्री करणाऱ्यांना अटक
कागदी पिशव्यांचा वापर करा
हातगाडीवाले, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते आदींवर वॉर्डात काम करणाऱ्यां सफाई जवानांसह स्वच्छता निरीक्षकांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच होलसेल दुकानदार व मोठ्या दुकानदारांवर वॉर्ड अधिकाऱ्यांकडून जप्तीची कारवाई करून दंड लावण्यात येतो. मुख्य बाजारपेठेमध्ये विक्रेते कॅरीबॅगचा वापर करतात. नागरिकांनी स्वत:हून कॅरीबॅग तथा प्लास्टिक पिशवीचा वापर टाळून कापडी, कागदी पिशव्यांचा वापर करावा.
पर्यावरण जनजागृतीसाठी इको क्लबची स्थापना
२ ते अडीच लाखांचा दंड
पाचशेपेक्षा अधिक जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ ते अडीच लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. मनपा उपायुक्त रवींद्र जोगदंड यांच्या मार्गदर्शनखाली कारवाई करण्यात येते. – प्रमोद जाधव, नागरिक मित्र प्रमुख अधिकारी