अब्दुल सत्तार-जो पक्षसाठी काम करेल त्याला न्याय मिळेल
-मंत्री अब्दुल सत्तार यांचे कार्यकर्त्यांना आश्वासन
जो पक्षसाठी काम करेल त्याला न्याय मिळेल
-मंत्री अब्दुल सत्तार यांचे कार्यकर्त्यांना आश्वासन
कन्नड : पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तुम्हाला जे पाहिजे ती ताकद देण्याचे काम मी तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही. तुम्हाला फक्त सर्व जाती धर्माच्या लोकांना जोडण्याचे काम आता करायचे आहे. जो पक्ष वाढीसाठी तळागाळात जाऊन काम करेल त्याला पक्षाकडून न्याय मिळेल असे आश्वासन पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोमवारी केले.
एंजल टॅक्सबाबत मोठी घोषणा
मद्य परवाना तपासणी होत नसल्याने मद्यपींची मजा
निवडणुकीपूर्वी राज्यात मोठा भूकंप?
मंत्री अब्दुल सत्तार यांची नियुक्ती कन्नड विधानसभा निवडणूकीसाठी प्रभारी व निरीक्षक म्हणून झाल्याने शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कार्यकर्त्यांची आढावा बैठक शहरातील एका खाजगी मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी मंत्री सत्तार बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची कानउघडणी करताना म्हणाले की,
“केतन लोकांच्या सुखा-दुखात, लग्नाकार्यात, तळागाळात जाऊन लोकांची कामे करतो. जो काम करतो त्यांंचे लायसन्स हे कार्यकर्ते असतात. ज्याला पक्षाचे काम करायचं नसेल त्यांनी उगाच राजकारणाचे सोंग करु नका. खुशाल आप आपले धंदे सांंभाळा. कागदावरचे घोडे कधीच नाचत नसतात हे लक्षात ठेवा.” अशा शब्दात मंत्री सत्तार यांनी केतन काजे कौतुक करत माजी आमदार नितीन पाटील, जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत यांना खडे बोल सुनावले.
निवडणुकीपूर्वी राज्यात मोठा भूकंप?मराठा समाजाला आरक्षण बाबत सरकार सकारात्मक
यावेळी जिल्हाध्यक्ष भरतसिंग राजपूत, माजी आमदार नितीन पाटील, महिला जिल्हाध्यक्ष पुष्पाताई गव्हाणे यांची भाषणे झाली. तालुका प्रमुख केतन काजे यांनी प्रास्ताविक, बाजार समितीचे सभापती डॉ. मनोज राठोड यांनी सूत्रसंचालन करत आभार मानले. यावेळी उपजिल्हाप्रमुख केशव राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्या शुभांगी काजे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.