आम्ही विरोधकांकडे का जायचे? सत्ता तुमची आहे -मनोज जरांगे पाटील

- मनोज जरांगे पाटील यांचा सत्ताधाºयांना सवाल

0

आम्ही विरोधकांकडे का जायचे? सत्ता तुमची आहे -मनोज जरांगे पाटील

-मनोज जरांगे पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

तुळजापूर : गावात सरपंच निवडून आला असेल तर नागरिक त्यांच्या समस्या सरपंचाकडेच मांडणार, की पडलेल्या उमेदवाराकडे मागणार? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी पक्षांना विचारला आहे. सत्ताधारी पक्षाकडे मराठा समाजाचे आंदोलक गेले असता ते विरोधकांकडे जा, असा सल्ला देतात. मात्र विरोधकांकडे का जायचे? सत्ता तुमची आहे, तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, तुम्हाला मराठा समाजाची फसवणूक करायची आहे का? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. ते सोलापूर दौºयाला निघण्यापूर्वी तुळजापूर येथे माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी मराठा समाजाच्या विरोधात अभियान उघडले असून दरेकर हे मराठा समाजाच्या लेकरांचे वाटोळ करीत आहेत. हे मराठा समाजाला कळले आहे. त्यामुळे कोणाच्याही दारात जाऊन जाब विचारण्याची गरज नाही, हे मी सर्व मराठा समाजाला सांगितले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे अभियान कोणीही चालवू नये. मुंबईत कोणाच्याही दारापुढे जाण्याची मराठा समाजाला आवश्यकता नाही, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

१३ ऑगस्ट पर्यंत शांतता रॅली

मनोज जरांगे पाटील यांचा दौरा ७ ऑगस्टपासून सुरू होणारा त्यांचा हा दौरा १३ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. यामध्ये सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यादेवी नगर म्हणजेच अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यात शांतता रॅली निघणार आहे.

५० टक्कयांच्या आतच आरक्षण द्या

राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवले आहे. असे असताना आम्हाला ५०% च्या वरती आरक्षण का देत आहात? असे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. त्यामुळे ५० टक्कयांच्या आतच मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या, अशी मागणी देखील जरांगे यांनी पुन्हा केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.