मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या बॅनरची भिती कशासाठी

– वाढदिवसाचे बॅनर फाडल्याने मराठा समाज आक्रमक

0

मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या बॅनरची भिती कशासाठी?

– वाढदिवसाचे बॅनर फाडल्याने मराठा समाज आक्रमक 

किल्ले धारूर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी आरक्षणाची मागणी लावून धरल्यापासून त्या मागणीला मोठ्या प्रमाणात विरोध होत असला तरी मात्र मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील मागे हटण्यास तयार नाहीत. त्यात काही पक्ष संघटना सगेसोयरे आणि शिंदे समितीने शोधलेल्या कुणबी नोंदी रद्द करण्यासाठी जिवाच्या आकांताने ओरडत असल्या तरी मात्र दुसरीकडे भारतीय बौद्ध महासभेचे डाॅ. राजररत्न आंबेडकर हे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आरक्षण मागणी सोबत ठामपणे सोबत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ते मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी आले असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यात जरांगे पाटील यांचा वाढदिवस असल्याने जवळपास संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावले गेले. मात्र कारी येथील फाट्यावर लावलेले मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर समाजकंटकांनी फाडल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. या समाज कटकांना मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या बॅनरची भिती कशासाठी? असा प्रश्न यामाध्यमातून विचारला जात आहे.

बॅनरची भिती कशासाठी

महात्मा जोतिबा फुले यांनी आपल्या साहित्यातून शेतकरी नेमका कोण? याविषयी मांडणी करून आजचा जो कुणबी आहे तो मराठा असल्याची उघड मांडणी केली. त्याच मांडणीचा अंधार घेऊन जर मनोज जरांगे पाटील आपली आरक्षणाची मागणी रेटून धरत असतील तर त्यात गैर काय? पण त्यांनी कुणबी आरक्षणाची मागणी लावून धरल्यापासून राजकारणातून आपलं अस्तित्व संपते की काय या भितीपोटी अनेक पक्ष नेते आणि संघटना खडबडून जाग्या झाल्या मात्र त्यांना ही जागा आली तेव्हा त्यांना महात्मा फुलेंच्या साहित्याचा विसर पडला हे दुर्देव म्हणावे लागेल. त्यात तालुक्यातील कारी येथे फाट्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर गावकऱ्यांनी लावले होते मात्र काही समाजकंटकांनी ते रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन फाडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. या बॅनरची एवढी भिती कशासाठी असा प्रश्न देखील यामाध्यमातून विचारला जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर वृक्षारोपण व रक्तादानाचे कार्यक्रम झाले. त्यातून लाखो झाडाची लागण करण्यात आली. याचे औचित्य साधून मनोज जरांगे पाटील यांनी आपला देहदानाचा संकल्प केला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या डाॅ. राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आम्ही तुमच्या मागणीच्या पाठीशी आहेत असा विश्वास देऊन मी देवेंद्र फडणवीस यांच्या इशा-यावर भूमिका बदलत नाही, ओबीसी आरक्षण बचाव पण ते कोणापासून असा मार्मिक प्रश्न उपस्थित करून त्यांनी पूजा खेडकर प्रकरणावर आपली भूमिका मांडली.

Leave A Reply

Your email address will not be published.